संध्या भाग #७ “क्या से क्या हो गया”

संध्या

— भाग #१ “पत्र” —

https://girishshenoy10.wordpress.com/2015/06/18/संध्या-भाग-१-पत्र/

— भाग #२ “पोचपावती” —

https://girishshenoy10.wordpress.com/2017/05/29/संध्या-भाग-२-पोचपावती/

— भाग #३ “गैरसमज” —

https://girishshenoy10.wordpress.com/2018/01/09/संध्या-भाग-३-गैरसमज/

— भाग #४ “फुटकं नशीब” —

https://girishshenoy10.wordpress.com/2018/03/28/संध्या-भाग-४-फुटकं-नशीब/

— भाग #५ “अशी ही मनवामनवी” —

https://girishshenoy10.wordpress.com/2018/03/29/संध्या-भाग-५-अशी-ही-मनवामा/

— भाग #६ “अशी ही फसवाफसवी” —  

https://girishshenoy10.wordpress.com/2019/04/03/संध्या-भाग-६-अशी-ही-फसवाफ/

— भाग #७ “क्या से क्या हो गया” — 

जान्हवी बाथरूम मध्ये गेली होती आणि तिच्या पाटोपाट तिला सावरायला संध्या देखील बाथरूमच्या दिशेने धावली होती. पूर्ण पार्टीचे वातावरण आता बदललेले होते. सूर्याला याची जाणीव होते आणि तो माईक वर बोलायला सुरु करतो. 

सूर्या: My dear colleagues, सच बोलू तो हा कार्यक्रम मी बँकेतच करणार होतो पण तसं न करण्याचे कारण देखील होते. मला आताच कळलं आहे की आजचे आपले महत्वाचे पाहुणे आलेले आहेत. मी त्यांना घेऊन येतो तब तक जोशी मॅडम आप जरा संध्या और जान्हवी को ले आईए.

सूर्या (अचानक माईक वर ओरडतो): Guys, get on the task the surprise is here.

सूर्या असं म्हणताच न जाणे कुठून एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची काही मुलं-मुली धावपळीला लागली. काही क्षणात आजूबाजूचा माहोल बदलला होता. आता जान्हवी आणि संध्या देखील हॉल मध्ये आले होते आणि हॉटेल मध्ये काय चाललंय हे त्यांना पण कळत नव्हतं. स्टेजवरचं बॅकड्रॉप वगैरे बदललं जातं आणि हॉटेल मध्ये एखादं लग्न असल्यासारखं वाटू लागतं.

जान्हवी बाथरूम मध्ये रडत असते. संध्या बाथरूम मध्ये पोहोचताच तिला जोरात मिठी मारते.

जान्हवी: Sandy, बघितलंस ना कसं माझ्या भावनांशी खेळला तुझा सूर्या? छान फसवलंत ग मला तुम्ही दोघींनी मिळून. 

संध्या: जानू तू काय बोलत आहेस?

जान्हवी: हो मी बरोबर बोलत आहे. तुम्ही दोघांनी मला फसवले आहे. माझ्या मागे तुम्ही गपचूप भेटायचा ते या सर्वासाठीच. का केलंस असं Sandy? कमीतकमी तू मला खरं काय ते सांगायचं ना! मी स्वतःहून निघाली असती तुमच्या दोघांमधून.

संध्या: जानू, तू उगीचंच माझ्यावर नसते ते आरोप लावत आहेस. तुझ्यासोबत जे झालं ते मला देखील आवडलेले नाही आणि याचा जाब मी सरांना विचारणार आहेच पण आज ती वेळ नाही.

जान्हवी: उगीचंच काही माहित नसल्याचा आव आणू नकोस संध्या आणि आता तू इकडून गेलीस तर बरं होईल. बाहेर मॅनेजर सरांना आपल्या डेप्युटी मॅनेजरची गरज असेल पुढच्या प्लॅनिंगसाठी.

संध्या: जानू, तू सद्य रागात काय बोलत आहेस हे बहुदा तुला देखील कळत नाही आहे आपण नंतर बोलू.

जान्हवीच्या उत्तराची अपेक्षा न करता संध्या तिकडूननिघून जाते. जान्हवीदेखील संध्याकडे बघत नाही.

संध्या बाहेर येताच तिला हॉटेलमधलं वातावरण आवाक करतं. ती इकडे तिकडे बघतच असते. नक्की काय चाललंय हे कळेनासं होतं. इतक्यात कोणीतरी संध्याला हाक मारतं. संध्या मागे वळून पाहते तर सूर्या असतो.

संध्या: सर

सूर्या संध्याला वाक्य सुरु पण करू देत नाही. मधेच बोलतो.

सूर्या: मला माहिती आहे तुम्हाला कूप प्रश्न पडले आहेत. तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल पण तुम्हाला त्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे.

संध्या: पण सर.

सूर्या: Wait अँड watch संध्या मॅडम. 

इतकं बोलून सूर्या तिकडून निघून जातो. संध्याला इतकं कळलं होतं की सूर्याचा डाव अजून संपलेला नाही आणि त्याच्या डोक्यात काहीतरी भयंकर असं सुरु आहे.

एका कोपऱ्यात संध्या विचार करत असते तितक्यात माइक वर सूर्या बोलू लागतो.

सूर्या: Dear Friends, I request all of you to assemble near the stage set for night. This is going to be one of the memorable nights for me. संध्या मॅडम तुम्ही सर्व ladies देखील या. जरा सर्वांना जमा करा आणि सांगा मेकअप पुरे.

ऑडियन्स मधले सर्व हसतात.

बँकेतील सर्व कर्मचारी स्टेज समोरील एक-एक खुर्चीवर स्थानपन होतात. जान्हवी स्वतःला सावरून आता बाथरूम मधून बाहेर आलेली असते पण ती संध्याच्या बाजूला येऊन बसत नाही. संध्या या गोष्टीमुळे अस्वस्थ होते. ती जान्हवीला इशारा करायचा प्रयत्न करते इतक्यात सूर्या परत माइक वर बोलू लागतो.

सूर्या: फ्रेंड्स, आपले पाहुने आलेले आहेत आनी I would like to request all of you to welcome them with a big round of applause.

टाळ्यांचा कडकडाट होत असतो आणि आलेल्या पाहुण्यांना बघून जान्हवीच्या पाया खालची जमीन सरकते. आश्चर्याने ती संध्याकडे बघते आणि संध्या देखील जान्हवीकडे तितक्याच आश्चर्याने बघत असते.

सूर्या: A big welcome Mr. and Mrs. Shinde.

Mr. and Mrs. Shinde दुसरं तिसरं कोणी नसून जान्हवीचे आई-वडील असतात. 

शिंदे काका आणि काकू आपल्या मुलीकडे पाहून स्माईल करतात.

सूर्या: सर, मॅडम तुम्ही इथे आलात खूप खूप धन्यवाद. बाकीचे पाहुणे जे मागे बसले आहेत त्यांचं सुद्धा स्वागत.

जान्हवी आणि संध्या एकत्र मागे बघतात आणि त्यात अजून काही ओळखीचे चेहरे असतात. संध्याला आता कळतं की बाथरूमला जात असताना तिला झालेला भास हा भास नसून ते जान्हवीचे आईवडिलच होते. सूर्या परत माइक वर बोलू लागतो.

सूर्या: मी शिंदे काकांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.

शिंदे काका: सर्वप्रथम तर मला विश्वास होत नाही आहे की माझी मुलगी ज्या बँकेत काम करते त्या बँकेच्या कार्यक्रमात आम्हाला बोलावण्यात आले आहे. यासाठी मी नायर सरांचा आभारी आहे. हा सर्व त्यांचाच प्लॅन होता.

बँकेतील सगळे कर्मचारी एकमेकांकडे आश्चर्याने बघत असतात. शिंदे काका पुढे बोलू लागतात. 

शिंदे काका: काही दिवसांपूर्वी नायर सर आमच्या घरी आले आणि ते जे बोलले त्याने आम्ही धन्यच झालो. जान्हवी बेटा जरा जवळ येतेस का?

जान्हवीला काही कळेना पण बाबांनी बोलावलं आहे म्हटल्यावर जावं तर लागणार होतं. जान्हवी संध्याकडे “ये ना माझ्यासोबत” या नजरेने पाहते आणि संध्याला जान्हवीची नजर कळते. संध्याला सोबतीला घेऊन जान्हवी स्टेजवर जाते. शिंदे काका जान्हवीलामिठी मारतात आणि शिंदे काकू आपल्या मुलीच्या कपाळावर पापी देतात. कोणाला ही कळत नव्हतं की स्टेज वर काय चालू आहे. इतक्यात परत शिंदे काका माइक वर बोलू लागतात. 

शिंदे काका: काही दिवसांपूर्वी नायर सर जेव्हा घरी आले आणि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून आजचा हा सर्व बेत आखला. मला तुम्हां सर्वांना सांगायला आवडेल की नायर सरांनी आपली जीवन संगिनी म्हणून आमच्या मुलीची निवड केली आहे आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीने ते साखरपुडा करत आहेत.

शिंदे काकांनी हॉटेल मध्ये बॉम्बचं टाकला होता. हॉटेलमध्ये स्मशान शांतता पसरली होती तितक्यात कोणाला तरी टाळी वाजवून दोघांचं अभिनंदन करायचं सुचलं. हॉटेल मध्ये टाळ्यांचा कडकडाट सुरु झाला. इव्हेंट मॅनॅजमेन्ट मधील एका मुलाने व्हीलचेअर वर असलेल्या सूर्याच्या आईला आणलं तर एक मुलगी दोन अंगट्या घेऊन स्टेज जवळ येत होती. जान्हवी आणि संध्याला विश्वास होत नव्हता. धक्का असा होता की जान्हवीच्या आईला २-३ वेळा जान्हवीला सांगून द्यावं लागलं की तिचाच साखरपुडा होत आहे.

बँकेतील सर्व कर्मचारी शॉक मध्ये होते पण आता engagement साठी सज्ज झाले होते.

—- भाग #७ “क्या से क्या हो गया” समाप्त —-

—- भाग #८ लवकरच —-

संध्या भाग #६ “अशी ही फसवाफसवी”

संध्या

— भाग #१ “पत्र” —

https://girishshenoy10.wordpress.com/2015/06/18/संध्या-भाग-१-पत्र/

— भाग #२ “पोचपावती” —

https://girishshenoy10.wordpress.com/2017/05/29/संध्या-भाग-२-पोचपावती/

— भाग #३ “गैरसमज” —

https://girishshenoy10.wordpress.com/2018/01/09/संध्या-भाग-३-गैरसमज/

— भाग #४ “फुटकं नशीब” —

https://girishshenoy10.wordpress.com/2018/03/28/संध्या-भाग-४-फुटकं-नशीब/

— भाग #५ “अशी ही मनवामनवी” —

https://girishshenoy10.wordpress.com/2018/03/29/संध्या-भाग-५-अशी-ही-मनवामा/

— भाग #६ “अशी ही फसवाफसवी” —

जान्हवीची इच्छा नसताना ही संध्या तिला जबरदस्तीने चाट खायला घेऊन जाते. संध्या तिला धीर देत असते की सर्व काही ठीक होईल. ती जान्हवीला खडसावून सांगते, “जानू एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, सूर्या हा माझ्यासाठी फक्त आपल्या शाखेचा मॅनेजर आणि तू माझी सर्वात जवळची मैत्रीण. ही दोन नाती अगदी वेगळी आहेत आणि जे काही आता पर्यंत बँकेत झालं आहे त्याचा परिणाम मला या दोन्ही नात्यावर नकोय”. जान्हवी आता पर्यंत नॉर्मल झाली होती आणि संध्याच्या शब्दाला तिने फक्त मान डोलावून होकार दिला.

सूर्याच्या कॅबिन मध्ये घडलेल्या गोष्टीला आता दोन हफ्ते उलटून गेले होते. बँकेतील सगळी कामं नीट होत होती. सूर्या, संध्या आणि जान्हवी देखील कामात मग्न होते. इतक्या दिवसात कसला ही अनुचित प्रकार घडला नाही. सगळं काही नीटनेटकं सुरु असतानाच सूर्याने बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवला. सूर्याकडून आलेला ई-मेल पाहून सर्वांची रिऍक्शन जवळपास सारखीच होती – आश्चर्य आणि एक स्मिथ हास्य.

—– सूर्याचा ई-मेल —–

माझ्या मित्रांनो,

आपली बँक ही आपल्या ग्राहकांमध्ये आवडीची बँक आहे आणि त्याचं कारण म्हणजे तुम्ही आणि या बॅंकेला लाभलेली तुमची मेहनत. आपल्या याच मेहनतीला एक सलाम म्हणून बँकेने एक डिनर पार्टी करण्याचे योजिले आहे. येत्या शनिवारी “मैत्री कट्टा” येथे ही पार्टी आयोजित करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच आपण संध्याकाळी ७.३० पर्यंत “मैत्री कट्टा” येथे पोहोचून डिनरचा आस्वाद घेत आपल्या मैत्रीची एक आगळी वेगळी मैफिल रंगवायला हजर रहाल अशी अपेक्षा. या मैफिली मध्ये मी काही महत्वाच्या घोषणा देखील करणार आहे. तरी आपण सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती.

इतर माहितीसाठी तुम्ही HR टीमशी संपर्क करू शकता.

कट्यावर वाट बघणारा तुमचा मित्र,

सूर्या नायर

—– सूर्याचा ई-मेल समाप्त —–

सूर्याचा ई-मेल वाचून संध्याच्या वागण्यामध्ये काही फरक पडला नव्हता पण जान्हवी मात्र भलतीच उत्साहित होती. तिने मनातल्या मनात ठरवलं होतं की डिनर पार्टीच्या दिवशी तिला सर्वात सुंदर दिसायचंय. संध्यापेक्षाही सुंदर. तिने लगेच लिस्ट बनवायला सुरुवात केली आणि संध्यासोबत शॉपिंगला जायचे देखील ठरवले. तिच्याकडे चार दिवस होते सर्व तयारी पार पाडण्यासाठी. संध्या आपल्या कामाकडे लक्ष देत होती. तिच्यासाठी डिनर पार्टी इतकी आकर्षित करणारी नव्हतीच.

जान्हवीचं मन दुखू नये म्हणून जान्हवीसोबत ती ऑफिस झाल्यावर दररोज शॉपिंगला जायची. चार दिवस जान्हवीसाठी शॉपिंग करता करता तिने स्वतःसाठी देखील एक चांगला ड्रेस आणि त्याला साजेश्या अश्या इतर गोष्टी घेतल्या होत्या. आपल्या आईचं म्हणणं ती कसं टाळणार होती? आईमुळे का होईना तिने स्वतःसाठी काहीतरी घेतले होते.

शेवटी तो दिवस उजाडला. आज बँकेत जान्हवीचे मन लागत नव्हते कारण संध्याकाळी डिनर पार्टी होती आणि तिला सूर्यासाठी सुंदर दिसायचे होते. आपल्या विचारात मग्न असतानाच सूर्या तिच्या टेबलपाशी येतो. जान्हवी आपल्या केसांना कुरवाळत बसलेली असते आणि सूर्याच्या येण्याकडे तिचं लक्ष देखील नव्हते. संध्या तिला इशारे करायचे प्रयत्न करते पण सूर्याची नजर तिला तसं करण्यापासून थांबवते. सूर्याला येऊन जवळपास एक मिनिटं झालेलं असतं आणि जान्हवी भानावर येते.

जान्हवी (चाचपडत): अरे सर तुम्ही?

सूर्या: हो. मुझे माफ करा. तुमच्या स्वप्नामध्ये मी विल्लन म्हणून आलो ना.

जान्हवी: नाही सर. तसं कसं तुम्ही विल्लन? तुम्ही तर…

(संध्या हसते)

सूर्या (जान्हवीला वाक्य पूर्ण न करू देता): राहू द्या. जान्हवी मॅडम डिनर पार्टी संध्याकाळी आहे आता पासून त्याचे स्वप्न रंगवू नका. जरा ही फाईल पूर्ण करा आणि मला आणून द्या. जितकं लवकर पूर्ण होईल तितकंच बरं.

जान्हवी: हो सर.

सूर्या जान्हवीला काम सोपवून आपल्या कॅबिनकडे जातो. सूर्याने वळताच जान्हवी संध्याकडे रागाने बघते. संध्याला कळते जान्हवी का रागाने बघत आहे ते आणि स्वतःहून बोलते.

संध्या: अगं मी तुला सांगायचा खूप प्रयत्न केला पण तुझं लक्षच नव्हतं माझ्याकडे.

जान्हवी: आणि दात काढायला काय झालं होता तुला?

संध्या: भान हरपलेली लैला आपल्या मजनू समोर कशी चाचपडत होती ते बघून हसू आलं मला.

जान्हवी: जास्त दात नको काढूस. माहीत आहे ना आज हा मजनू काही तरी महत्वाची घोषणा करणार आहे. काय माहित उद्या पासून तुला मला जान्हवी मॅडम म्हणावं लागलं तर? मी जान्हवी शिंदे वरून जान्हवी नायर झाली तर?

संध्या: जानू नको नको ते स्वप्न नको बघूस. ऑफिसच्या पार्टी मध्ये कधी सर स्वतःचं खाजगी आयुष्य समोर ठेवणार नाहीत.

जान्हवी: गप्प ए माकडतोंडे. तू नाहीतरी जळतेस माझ्यावर.

संध्या हसत जान्हवीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि आपल्या कामाला लागते. जान्हवी देखील पार्टीला जायचंय म्हणून पटपट फाईल पूर्ण करायला घेते.

फाईलचं काम झटपट पूर्ण करून जान्हवी सूर्याकडे फाईल सुपूर्द करते आणि पुन्हा पार्टीच्या स्वप्नात मग्न होते. तिकडे संध्या आपलं काम करत असताना जान्हवी तिच्याकडे पोहोचते.

जान्हवी: Sandy, चल ना पॅन्टरी मध्ये तुला मेकअपसाठी आणलेला सामान दाखवायचा आहे.

संध्या: लैले, माझं अजून काम बाकी आहे.

जान्हवी: अगं सगळी मोह माया आहे गं.

संध्या: मॅडम तुमचा मोह कॅबिन मध्ये बसला आहे आणि मायाला मी ओळखत नाही.

जान्हवीचं तोंड पडलेले पाहून संध्या अजून तिची मस्करी करते.

संध्या: काय म्हणे तुमचे मजनू? आजच्या पार्टी मध्ये काही विशेष घोषणा वगैरे करणार आहे म्हणे, तुला त्याची कल्पना असेलंच.

जान्हवी: कसलं डोंबलाचा मजनू आणि घोषणा. बघत सुद्धा नाही माझ्याकडे तो.

इतक्यात सूर्या आपल्या कॅबिन मधून बाहेर येतो. थोडं रागातच असतो तो पण बहुदा पार्टीच्या मनःस्थितीत असलेल्या कर्मचाऱ्यांसमोर त्याला तो राग व्यक्त करायचा नव्हता.

सूर्या: जान्हवी, संध्या आणि जोशी मॅडम तुम्ही तिघी जरा माझ्या कॅबिन मध्ये या अभी. एका कामबद्दल बोलायचं आहे.

जान्हवी (संध्याच्या कानात): कॅबिन मध्ये बोलावले ते पण हड्डी सोबत. २-२ हड्डी ते पण. कबाब कधी बनवायला शिकेल देवास ठाऊक.

तिघेही सूर्याच्या कॅबिन मध्ये जातात. सूर्याच्या हातात ती फाईल असते जी जान्हवी काही वेळापूर्वी त्याला देऊन गेली होती.

सूर्या: जान्हवी आपने ये क्या किया है? मैंने आपसे क्या करने को कहा था और आपने क्या किया है? कभी तो काम पर ध्यान दिया किजीये.

जान्हवी: काय झालं सर? मी तर माझं शंबर टक्के देण्याचा प्रयत्न केला.

जान्हवी आता भलतीच दुखी झाली होती. मेकअपचं भूत देखील उतरलं होतं. सूर्या तिघींना परत काम समजावतो आणि लवकरात लवकर फाईल आणून द्यायला सांगतो.

सूर्या: जान्हवी आप संध्या और जोशी मॅडम के साथ बैठकर ये काम सीख लेना. अगली बार मुझे शिकायत का कोई मौका नहीं चाहिये.

जान्हवी मान खाली घालून होकार देते आणि तिघी निघण्यासाठी उठतात. इतक्यात सूर्या जोशी मॅडम आणि संध्याला कॅबिन मध्ये थांबायला सांगतो. जान्हवी निराश होऊन कॅबिन मधून निघून जाते.

सूर्या: संध्या और आप जोशी मॅडम, जान्हवी को अच्छे से तैयार करवाना.

संध्या: येस सर, अगली बार आपको कोई शिकायत नहीं होगी.

सूर्या: नाही नाही संध्या, तुम समझा नहीं. तिला आजच्या पार्टी मध्ये चांगली तैयार करून आणा. आज तिच्यासाठी खूप मोठा दिवस असणार आहे.

जोशी मॅडम: काय म्हणताय सर? असं काय होणार आहे आज?

सूर्या: तुम्ही दोघी आजच्या पार्टीला येणार ना?

दोघी एकत्र होकार देतात.

सूर्या: मग तेव्हा कलेल ना. आता ही फाईल लवकरात लवकर द्या मला आणि मी सांगितलेल्या कामाला लागा. जान्हवीला तैयार करायच्या कामात.

दोघी सूर्याच्या कॅबिन मधून निघतात. संध्या आता अस्वस्थ झालेली असते. तिला सूर्याच्या डोक्यात काय चालू आहे ते ओळखता आलेलं नसतं.

तिघीही काम पूर्ण करून फाईल सूर्याला देतात आणि पार्टीच्या तैयारीला लागतात. बँकेचे कॉन्फरेन्स रूम आज मेकअप रूम झाले होते. बँकेतील सर्व महिला कर्मचारी आता तिथे जमल्या होत्या.

— बँकेची पार्टी —

बँकेतील सर्व कर्मचारी मैत्री कट्यावर जमलेले असतात आणि गप्पा गोष्टी रंगलेल्या असतात. सर्वच कर्मचारी एकदम सजून-धजून येतात कारण बँकेने पहिल्यांदाच असल्या काही इव्हेंटचे प्रयोजन केले होते. सर्व गप्पा गोष्टी मध्ये रंगलेले असतानाच तिकडे सूर्या माईक घेऊन सर्वांच्या समोर येतो.

सूर्या: हॅलो हॅलो माईक टेस्टिंग. आवाज येतो ना सर्वाना?

सगळे एका सुरात होकार देतात.

सूर्या: गुड. आज मला हिंदी आणि इंग्लिश मध्ये बोलू द्या because somebody told me, I speak very bad Marathi. (असं बोलून सूर्या जान्हवीकडे बघतो. ती ही लाजत खाली मान घालते.)

सूर्या: Now let me come to the point. I have been fortunate enough to get such a fantastic staff which has brought laurels to our branch and today I am very happy while I am announcing this. Your efforts are well observed by the management आणि म्हणूनच आज आपण काही महत्वाच्या घोषणा करणार आहोत. Personally, आजचा दिवस मेरे लिये बहुत important आहे. घोषणा झाल्यावर आपल्यासाठी डान्स फ्लोर ओपन असेल. तुम्ही सर्व डान्स करून एन्जॉय करा आणि डिनर केल्याशिवाय जाऊ नका. सर्वात पहिले म्हणजे मिड इयर प्रोमोशन. आपल्या शाखेचे business बघता management ने काही outstanding employees ना मिड इयर प्रोमोशन देण्याचे ठरवले आहे.

हे ऐकताच कर्मचाऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण होतो.

सूर्या: सर्वात पहिला म्हणजे – शिंदे काकू.. १ तारखेपासून शिंदे काकू दादर ब्रांच के सिनियर ऑडिटर होंगे. I would like to call शिंदे काकू here. जोरदार ताली बजाओ.

हे सगळं अनपेक्षित असतं. शिंदे काकू हडबडून स्टेज वर पोहोचतात. टाळ्यांच्या कडकडाटात शिंदे काकू प्रोमोशनचे पत्र स्वीकारतात.

सूर्या: आता दुसरा प्रोमोशन. विशाल राऊत. विशाल राऊत १ तारखेपासून अंधेरी ब्रांच के चीफ कॅशियर होंगे.

टाळ्यांच्या कडकडाटात विशाल राऊत प्रोमोशनचे पत्र स्वीकारतात.

सूर्या: आता तिसरा आणि शेवटचं प्रोमोशन. ओळखा पाहू कोणाचं असेल?

प्रेक्षक अनेक तर्क वितर्क लावण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी सूर्याकडे उत्तरासाठी बघतात.

सूर्या: चला तुम्हाला एक हिंट देतो मग देखते है कि आप लोग पहचान पाते हो या नहीं. This lady is exceptional. या आपल्या प्रत्येक कस्टमरला ओळखतात आणि प्रत्येक कस्टमरचंदेखील यांच्यावर तितकंच प्रेम आणि आदर आहे.

एक सुरात सर्वांनी संध्याचं नाव घेतलं.

सूर्या: एकदम बरोबर. संध्या मॅडम या आणि आपलं प्रोमोशन पत्र स्वीकारा. तुम्हीच लोकांना सांगा तुमच्या प्रोमोशनबद्दल. या.

संध्या उत्साहात स्टेजवर जाते आणि आपलं प्रोमोशन पत्र स्वीकारते. प्रोमोशन पत्र उघडताच संध्याच्या चेहऱ्यावरचे रंग बदलतात. ती आश्चर्याने सूर्याकडे पाहते.

सूर्या: वाचा वाचा संध्या मॅडम सगळे वाट बघत आहेत.

संध्या आपलं प्रोमोशन पत्र चाचपडत वाचते.

संध्या: Deputy Manager आपल्याच शाखेत.

सगळेच आवाक होतात आणि जोरदार टाळ्या वाजवतात. आपलं प्रोमोशन पत्र घेऊन संध्या आपल्या जागेवर जाऊन बसते.

सूर्या: पिचर अभी बाकी है मेरे दोस्त. अजून दोन महत्वाच्या announcements आहेत. उसमें से एक खबर का मुझे बेहद अफसोस है लेकिन दुसरी खबर उतनी ही ख़ुशी की है. पहली खबर.

सगळेच दीर्घ स्वास सोडतात कारण सूर्याच्या अनुसार अफसोस करणारी बातमी असते.

सूर्या: आपल्या ब्रांच मधून एक employee चं ट्रान्सफर होत आहे चिंचपोकळीच्या ब्रांचमध्ये. त्या employee चं नाव आहे. (सूर्या एक pause घेतो)

सगळ्यांचं लक्ष सूर्याकडे असतं.

सूर्या: आणि त्या employee चं नाव आहे जान्हवी शिंदे.

जान्हवी आपलं नाव ऐकून स्तब्ध होते. तिच्यासमोर जणू अंधारच पसरतो. संध्या आणि जोशी मॅडम ना देखील आश्चर्य वाटते कारण सूर्याच्या सांगण्यावरून जान्हवी खूप नटूनथटून येते पार्टीला आणि तिला अशी खबर मिळते. जान्हवी रडतच बाथरूमच्या दिशेने जाते. संध्याला देखील सूर्याचं असं वागणं आवडलेलं नसतं आणि ती जान्हवीच्या मागे धावते. जान्हवीच्या मागे धावत असताना संध्याचं लक्ष हॉटेलच्या दाराकडे जातं. तिथे उभे असलेले चेहरे तिला ओळखीचे वाटतात पण ती दुर्लक्ष करून बाथरूमच्या दिशेने जाते.

जान्हवीला आता कळलं होतं सूर्या तिच्या भावनांशी खेळला होता. आपल्या मनात असलेल्या प्रेमाखातर त्याने संध्याला प्रोमोशन दिले होते त्याही त्याने असलेल्याच शाखेत म्हणजे तो तिच्या अजून जवळ असेल आणि माझा काटा नको म्हणून मला ट्रान्सफर केले अशी भावना जान्हवीच्या मनात घर करून बसली होती.

तिची बाजू देखील बरोबर होती म्हणा. सूर्या वागलाच तसा होता.

 

—- भाग #६ “अशी ही फसवाफसवी” समाप्त —-

 

—- भाग #७ उद्या —-

लेबर रूम

लेबर रूम – ०४/०२/२०१९ ला आमचा चॅम्प शिवांश आमच्या आयुष्यात आला. विभूती (माझी बायको) हिला प्रसूती वेदना सकाळीच सुरू झाल्या आणि संध्याकाळी चिमुकला शिवांश आमच्या हाती होता. विभूती ला प्रसूती कक्षात घेऊन गेल्यावरचे माझे हे मनोगत..

आत घेऊन गेले आहेत
मम्माला तुझ्या
बाहेर थांबले आहेत
डॅडा आणि आजी

होईल ना सगळं नीट
याचीच आम्हाला काळजी

इतके दिवस सोनोग्राफी आणि तुझ्या किक
या मधूनच तुझी चाहूल लागायची
वेळ आज आली आहे
इवलुश्या तुला हातात घ्यायची

शपथ सांगतो पोटात गोळा आला आहे
कारण मम्मा तुझी अजुन आत आहे

कोण हवं? प्रिन्स की प्रिन्सेस असा प्रश्न सगळ्यांनीच विचारला
कोणीही असलं, चॅम्प असशील तू आमचा

अक्का आणि माऊ ऑफिस मध्ये कोणाचंच लक्ष नाही
मेक-अपचा सामान घ्यायचा की क्रिकेटचा सेट
हाच प्रश्न त्यांच्या मनी

सर्वच आहेत टेन्शन मध्ये
कारण आज आहे आमावस
पण मम्मा आणि डॅडा चिल्लड आहेत
कारण असणार आहेस तू ऑसम आणि गोंडस

आम्हां दोघांमध्ये येणारा तू तिसरा
सगळेच आम्हाला म्हणे दुःख सगळे आता विसरा

या आता लवकर
अजुन वाट पाहवत नाही
ऐकसाईटमेंट, नरवस्नेस, ए्नजायटी आता स्वस्थ बसू देत नाही

– तुझे डॅडा (मम्मा आत आहे आणि तुझीच वाट पाहत आहे)

द्वंद्व

​माणूस एक असा प्राणी आहे जो काहीही करू शकतो. त्याने ठरवले तर अशक्य असं काहीही नाही. डोकं लढवून, मन लावून केलेले काम नेहमीच यशस्वी होते, लहानपणापासून असेच आपल्याला शिकवण्यात आले आणि ते खरे देखील आहे म्हणा. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा त्याला सुचत नाही की निर्णय मनाने घ्यायचे की डोकं लढवून? सूर्या शेट्टीच्या आयुष्यात​ ही काही ​का​ळापासून असेच होत आले आहे.

सूर्या शेट्टी लहानपणापासूनच एक हुशार आणि होतकरू मुलगा होता. मुंबईमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेला सूर्या अभ्यासासोबतच सामाजिक कार्यातदेखील सक्रिय होता. सूर्या जे काही काम ​करत असे ते अगदी मनापासून​ करत असे आणि आपलं १००% देण्याचा प्रयत्न ​करत असे.

आजकाल सूर्याचे कसल्याही कामात लक्ष नसे. त्याचा चेहरा नेहमीच पडलेला असायचा. एक अतिउत्साही असलेला सूर्या अचानक मावळलेला सूर्या दिसत होता. काहीच मार्ग सुचत नसल्यामुळे शेवटी त्याच्या एका जवळच्या मित्राने त्याच्याशी बोलायचे ठरवले. या मित्राचे नाव होते गौरव. तिसरीत असल्यापासून गौरव आणि सूर्या एकत्र होते. खूप खोदून विचारल्यावर सूर्याने त्याच्या आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी सांगितल्या. गोष्ट तशी सामान्यच आहे कारण कधी-ना-कधी सर्वांच्याच आयुष्यात हे द्वंद्व घडतच.

सूर्याचे मन, सूर्याचं डोकं आणि सूर्या यांच्यातील “लव्ह ट्रायंगल” कसं त्याच्या आयुष्यातील समतोल ​बिघडवत होते या संदर्भातील काही किस्से त्याने गौरवला सांगितले.

———- सूर्याच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घडामोडी सूर्याच्याच शब्दांत ———-

– गोष्ट १ –

​​​मी ​दहावीची परीक्षा उत्तीर्ण ​झालो. अपेक्षेप्रमाणेच​ मला घवघवीत यश मिळाले होते. ​मी मित्रांमध्ये चांगलाच प्रसिद्द ​होतो पण आता माझ्याभोवती मुलीदेखील फिरू लागल्या होत्या. ​त्यातच ​माझी ओळख स्वप्नाली​शी झाली. स्वप्नाली सुंदर होती पण अभ्यासात तिचा हाथ थोडा तंग होता. अभ्यासात ​तिला माझी चांगली मदद मिळेल या आशेने ​तिने माझ्याशी आपली असलेली ओळख वाढवली. आपण मैत्रीची सीमा ओलांडून कधी पुढे गेलो हे ​मला कळलेच नाही. आता ​आम्ही ​दोघेही सतत एकत्र राहण्याचे कारण शोधत ​होतो आणि एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळे ​आम्हाला अश्या संधीची वाट बघत बसायची गरज नव्हती. ​आमच्या भेटीगाठी आता अधिकच वाढल्या होत्या. यातच ​आमची बारावीची परीक्षा आली. स्वप्नालीला तिच्या दहावीपेक्षा खूप चांगलेच गुण मिळाले होते पण ​मी मात्र बॅकफूट वर गे​लो हो​तो​.

मी त​सा​ मूळ कर्नाटकचा आणि स्वप्नाली राजस्थानची. ​स्वप्नालीच्या बोलण्याने आणि वागण्याने ​मला माहित होते की तिचा परिवार​ आमच्या नात्याला कधीच होकार देणार नाही. माझ्या डोक्याने मला तसे संकेत दिले होते पण मी मनापासून स्वप्नालीवर प्रेम करू लागलो होतो. माझ्या मनाने माझ्या डोक्यावर पूर्णपणे ताबा घेतला होता. या नात्यातील सर्व निर्णय ​मी आपल्या मनाने घेत हो​तो​. ​माझं मन​ मला सतत विचारत होतं, “अरे सूर्या, मी तुला कधी चुकीचा सल्ला देईन का?” आणि तसेच ​माझं डोकं ​मला वारंवार सांगत होतं की यात ​मी गुरफटलो जाणार आणि झाले देखील तसेच. एका दिवशी अचानक स्वप्नाली ​मला सांगते आपल्यातली सर्व नाती संपली. या सर्व घडामोडींमुळे​ मी भलताच​ हादरलो होतो. माझं मन आणि डोकं यामधील युद्धात कोणीही जिंकले किंवा हरले ​असेल ​पण ​माझ्या आत्मविश्वासाचा ​मात्र दारुण पराभव झाला होता.

गोष्ट

स्वप्नाली प्रकरणामुळे ​माझ्यामध्ये भरपूर बदल झाले होते​ पण माझ्या महत्वाकांक्षामध्ये मात्र काही बदल झाला नव्हता. ​मला माहित होते ​मला माझ्या आयुष्यामध्ये काय हवे ​आहे ​फक्त ते मिळवण्यासाठी जो मार्ग ​मी निवडला होता तो ​मला स्वतःला साजेसा नव्हता. ​मला आपल्या शालेय दिवसापासून अभियंत्रक (इंजिनिअर) व्हायचे होते. ​मी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. ​माझे मन ​मला सांगत होते की ​मी एक चांगला कॉम्प्युटर इंजिनिअर बनू शकतो पण ​मला कॉम्प्युटर क्षेत्रात प्रवेश न मिळता टेलीकॉम्म्युनिकेशन मध्ये प्रवेश मिळाला. ​माझ्या डोक्याने​ ​मला म्हटले​,​ ​”​मी आज पर्यंत तुझी साथ सोडलेली नाही​. ​काय झालं जर तुला कॉम्प्युटर इंजिनिअर बनता आले नाही, माझा वापर करून तू एक चांगला टेलीकॉम्म्युनिकेशन इंजिनिअर नक्की होशील”​. चार वर्षाचे अभियांत्रिकी शिक्षण घेऊन ​मी टेलीकॉम्म्युनिकेशन इंजिनिअर ​झालो ​तर हो​तो पण आपलं लहानपणापासून असलेले स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद मात्र ​माझ्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. तेव्हा ​माझ्या मनाने टोमणा मारला.. “तुला ही माहित होते तुला काय करायचे आहे पण तू माझ्यावर विश्वास नाही दाखवलास. तुझ्या डोक्याने तुझ्यावर पूर्णपणे ताबा घेतला होता. तुझ्याकडे तुझ्या स्वतःच्या मनाचा कौल ऐकण्यासाठी वेळच व्हता.  ​माझं मन आणि डोकं यामधील युद्धात कोणीही जिंकले किंवा हरले ​असेल​ पण ​मी मात्र कमालीचा निराश​ झालो होतो.

– गोष्ट ३ –

​मी आता २३ वर्षांचा ​झालो होतो. स्वप्नाली नंतर ​माझा प्रेम या शब्दावरूनच नव्हे तर भावनेवरून देखील ​विश्वास ​नाहीसा झाला होता. या काळात ​मी काही अप्रतिम असे मित्र-मैत्रिणी जमवले. आता​ ​मी स्वप्नाली प्रकरणाला मागे टाकून आयुष्याकडे नव्याने पाहू​ लागलो होतो. मी पूर्णपणे आधीसारखा​ राहिलो नव्हतो पण जी प्रगती होत होती ती पण काही वाईट नव्हती. ​माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींमध्ये एक विशेष अशी मैत्रीण झाली होती.. तिचे नाव होते पूजा. पूजा आणि ​माझ्यामध्ये मैत्री पेक्षा वेगळंच काहीतरी शिजतंय हे ​आमच्या दोघांच्या मित्र-मैत्रिणींना माहित होते पण ​आम्ही दोघं हे कधीच मान्य करत​ नव्हतो. मला आयुष्यात काय हवे हे पूजाला माहित होते आणि असं म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हाथ असतो, पूजाला ​माझ्या ​यशा मागची ती स्त्री व्हायचे होते. ​मी देखील आपल्या आयुष्यातील निर्णय घेताना आता पूजा कढून सल्ले ​घ्यायचो.

पूजाचा वाढदिवस होता आणि तिला काहीतरी सरप्राईज द्यायचे असे ठरवले. पूजाला शिरा जाम आवडायचा आणि म्हणूनच आपल्या हाताने शिरा करून तिला सरप्राईज द्यायचा बेत​ मी आखला. ठरल्याप्रमाणे​ मी शिरा बनवला आणि पूजाला दिला. पूजाला वाटले​ माझ्या घरी शिरा बनवला होता आणि त्यातूनच थोडासा ​मी तिच्यासाठी आणला. पूर्ण शिरा संपल्यानंतर पूजाकडून शिऱ्याची स्तुती ऐकण्यात ​मला एक वेगळाच आनंद मिळत होता. अगदी निघताना ​मी पूजाला सत्य काय ते सांगितले. पूजाला तर विश्वासच बसेनासा झालं होतं. शिऱ्याच्या या यशस्वी प्रयत्नानंतर आता ​मी इंटरनेटच्या मदतीने नेहमीच काही ना काही बनवाय​चो आणि सगळेच आपली बोटं चाटत. इकडूनच आता ​मला पुढे शिकायची इच्छा झाली. ​मी हॉटेल मॅनेजमेन्टचे शिक्षण घ्यायचे ठरवले होते. पूजाचं मत मात्र वेगळं होतं. ​माझा अर्थ व्यवहार म्हणजे ​असं ज्याला काही तोडच नाही आणि म्हणूनच पूजाचं आणि ​मला ओळखणाऱ्या प्रत्येकाचं मत ​असंच होतं की ​मी ‘फायनान्स’ मधून मॅनेजमेन्टचे शिक्षण घ्यावे. पूजाने आणि इतर माणसांनी ​माझ्या डोक्यात भरले होते की ​मी जितकं उत्तम फायनान्स मॅनेजमेन्ट करू शकतो तितकं इतर काहीही नाही करू शकत. ​माझ्या आयुष्यात परत एक द्वंद्व होतंडोकं म्हणत होतं फायनान्स मॅनेजमेन्ट आणि मनहॉटेल मॅनेजमेन्ट. ​मला स्वतःला विश्वास होता की ​मी उत्तम फायनान्स मॅनेजमेन्ट करू शकतोच पण ​मला आता मनाचं ऐकायचं होतं आणि ​झालं देखील तसंच – ​मी यशस्वीरित्या हॉटेल मॅनेजमेन्टचे शिक्षण पूर्ण केलं. ​माझं मन आणि डोकं यामधील युद्धात मन जिंकले किंवा डोकं हरले हे ठरवता आले नाही पण ​मी मात्र खुश ​होतो​.

– गोष्ट ४ –

​माझे हॉटेल मॅनेजमेन्टचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि ​आता मी ​कामावर देखील जाऊ ​लागलो होतो. घरात उत्पन्न देखील बऱ्यापैकी जमा होत होते. ​मला स्वतःचं असं काहीतरी उद्योगधंदा करायचा होता आणि म्हणूनच ​मला माझ्या कामावर इतके प्रेम नव्हते. ​मी माझे काम इमानदारी ने कराय​चो पण उद्योजक होण्याची ​माझी इच्छा ​मला कुठेही स्वस्थ बसू देत नव्हती. ​माझी ही इच्छा देखील पूजाने ओळखली होती. तिचं म्हणणं हो​तं तुला जे करायचे ते कर पण आपला कामधंदा न सोडता कर. कामधंदा असल्यामुळे तुला महिन्याअखेरीस तुझा पगार वेळेवर मिळतो पण तुझा उद्योगधंद्याला जम ​बसे पर्यंत तुझ्या उत्पन्नाचं काय? ​माझ्या आयुष्यातील इतर महत्वाच्या व्यक्तींनी देखील हाच सूर लावला. ​माझ्या डोक्याला यासर्वांचं म्हणणं पटत होतं पण मन मात्र स्वस्थ बसू देईना. ​माझ्या आयुष्यातलं हे एक नवीन द्वंद्व होतं – डोकं म्हणत होतं कामधंदा आणि मन – उद्योजक. ​मी ​आजही कामधंदाच करतो. ​माझं मन आणि डोकं यामधील युद्धात डोकं जिंकले किंवा मन हरले हे ठरवता आले नाही पण ​मी मात्र आतून मरत हो​तो​.

– गोष्ट ५ –

​मी आता एका पंचतारांकित हॉटेल मध्ये चांगल्या हुद्द्यावर कामाला हो​तो​​. ​माझं पूजाशी लग्न देखील झालं होतं. पूजा सुद्धा चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर कामाला होती. ​आमच्या संसाराचा गाडा अगदी आनंदात चालला होता. त्यातच पूजाची बढती झाली होती. नवीन पद अधिकच जबाबदारीचे होते. ही बढती स्वीकारणे म्हणजे पूजाचा प्रवास वाढणार होता आणि​ ​माझ्यापासून ती तितकंच लांब ​जाणार होती. तिने नेहमीप्रमाणे ​माझं मत विचारलं. माझ्या वैवाहिक आयुष्यात द्वंद्व होतंडोकं म्हणत होतं पूजाला जाऊ दे. तिच्या कारकिर्दीसाठी ते खूप लाभदायक ठरणारं होतं आणि आमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारली असती आणि मन म्हणत होतंतू तुझ्या बायकोपासून लांब नाही राहू शकत आणि तिला ही बढती स्वीकार असे मत नको देऊस. या वेळी ​मी मागचा-पुढचा विचार न करता ​माझ्या डोक्याचं म्हणणं ऐकलं आणि पूजाला बढती स्वीकारण्याचे मत दिले. पूजाने देखील ​माझा शब्द पडू दिला नाही आणि तिने ती बढती स्वीकारली. ​माझं मन आणि डोकं यामधील युद्धात डोकं जिंकले किंवा मन हरले हे ठरवता आले नाही पण ​मी मात्र पूजाच्या आठवणीत असाय​चो​.

———-

सूर्याच्या आयुष्यातील या घडामोडी गौरवला माहित होत्या पण त्याला नेहमी वाटत होते की सूर्याने अगदी ठामपणे घेतलेले हे निर्णय आहेत. त्या निर्णयांमागचं द्वंद्व आज गौरवला कळले होते. सूर्या आपल्या चेहऱ्यावर स्मि​त हास्य आणून बोलू लागला – ​”​गौरव​,​ मला माहित आहे की माझं मन आणि माझं डोकं दोघंही माझ्यावर अपार प्रेम करतात आणि त्यांची अशीच इच्छा असते की मी खुश असावं आणि यशस्वी व्हावं पण हा लव्ह ट्रायंगल कधीही एका यशस्वी प्रेम कथा मध्ये रूपांतरित होणार नाही कारण परिस्थिती नुसार मला कधी माझ्या डोक्याचं ऐकावंसं वाटतं तर कधी मनाचं. ज्याला हा समतोल सांभाळता आ​ला ​त्याच्या आयुष्यामधील उत्कंठता नाहीशी होणार असं मला वाटतं​​.​”​

 

तुमच्या इथे ही लव्ह ट्रायंगलचं द्वंद्व असेलच

 

मूळ कल्पना व लेख : गिरीश शेणॉय

संपादन : मनाली पवार

एक निकाल… आयुष्याचा

निकाल आज हाती आला
तिच्या एका वर्षाच्या मेहनतीचा…

आयुष्यात शैक्षणिक यश महत्वाचं होतंच
पण तिच्या जीवापेक्षा नाहीच…

काय यश मिळाले मला
माझ्या १८ वर्षाच्या मेहनतीचे
ओंजारून गोंजारून प्रेमाने तिला वाढवल्याचे…

तिचा चेहरा देखील त्यांनी मला पाहू दिला नाही
खेकसून सांगत होती मी
मीच पाहिले होते रे तिला सर्वात आधी
देऊ ​द्या मला शेवटची एक पापी साधी…

इतकं मोठं पाऊल उचलताना
एकदा तरी आमचा विचार तिने करायचा
कालपर्यंत घरात धिंगाणा घालणारी ती
आता तिचा मृतदेह तरी कसा पाहायचा…

स्वप्ने पहिली होती मी
जाईल जेव्हा ती लांब आपल्या नवऱ्याकडे
सुन्न होईल सारे कसे

खरंच गेली ही कायमची
त्या निष्ठुर देवाकडे…

हे काय करून बसली ती कळेनासं झालंय
जीवित शरीर माझं
मृत झालंय…

—– मनोगत —–

काल CBSE बोर्डचा दहावीचा आणि आज महाराष्ट्र बोर्डचा बारावीचा निकाल जाहीर झाला.. त्यात एका मुलीने ७०% मिळवून सुद्धा जीव दिल्याची बातमी वाचली आणि माझं काळीज सुन्न झालं. आपल्या लहान मुलाने / मुलीने आत्महत्या केली हे कळल्यावर त्या मातेचे काय झाले असेल याचा विचार मनात थरकाप आणतो.. अश्या मात्यांना माझी ही कविता अर्पण..

एका कागदी निकालासाठी आपण जीव गमवावा इतका महत्वाचा नाही आहे तो कागद…

लेखक: गिरीश शेणॉय

विशेष आभार: गणेश तोडणकर आणि मनाली पवार

संध्या भाग #५ “अशी ही मनवामनवी”

संध्या

— भाग #१ “पत्र” —

https://girishshenoy10.wordpress.com/2015/06/18/संध्या-भाग-१-पत्र/

— भाग #२ “पोचपावती” —

https://girishshenoy10.wordpress.com/2017/05/29/संध्या-भाग-२-पोचपावती/

— भाग #३ “गैरसमज” —

https://girishshenoy10.wordpress.com/2018/01/09/संध्या-भाग-३-गैरसमज/

— भाग #४ “फुटकं नशीब” —

https://girishshenoy10.wordpress.com/2018/03/28/संध्या-भाग-४-फुटकं-नशीब/

— भाग ५ “अशी ही मनवामनवी” —

संध्या सूर्याला Smile देऊन गेली होती. तिकडे सूर्या संध्याशी स्वतःच्या लग्नाची स्वप्नं पाहत होता. मोबाईलची रिंग सूर्याला त्याच्या स्वप्नातून बाहेर आणते. मोबाईलवर बोलून झाल्यावर तो शरद करवी जान्हवीला बोलावून घेतो.

शरद: जान्हवी मॅडम सरांनी तुम्हाला आत बोलावलं आहे.

जान्हवी (अगदी भांबावून): काय?

(जान्हवी संध्याकडे भीतीच्या नजरेने पाहते)

संध्या: घाबरू नकोस. जा गड जिंकून ये. माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे.

(संध्याचं अगदी ऐतिहासिक बोलणं जान्हवीला संतप्त करत होतं – तिच्या हातात असलेल्या बाटलीने जान्हवीला मारून ती सूर्याच्या कॅबीनच्या दिशेने चालू लागते)

जान्हवी: मे आय कम इन सर?

सूर्या: हो या या जान्हवी आत या.

जान्हवी: हा सर बोला.. तुम्ही बोलावलात मला?

सूर्या: हो.. मला तुम्हाला काही विचारायचे होते.

जान्हवी (भीतीत आणि उत्साहात): हो सर संध्याला मीच सांगितले होते ते पत्र लिहायला. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला तुम्ही खूप आवडता. मी तुमच्याशी लग्न करून संसार थाटायची स्वप्नं पाहते. माझ्या घरून पण काही विरोध असेल असं मला वाटत नाही. मी आजच जाऊन माझ्याघरच्यांशी बोलते.

(सूर्या मधेच जान्हवीला थांबवतो)

सूर्या: मिस. जान्हवी अपने गाडी को जरा ब्रेक लगायें. मेरी बात ध्यान से सुने. आपके feelings कि मैं बहुत कदर करता हूं. पन तुमचं आणि माझं लग्नं शक्य नाही कारन…

(आता मध्ये बोलायची वेळ जान्हवीची होती)

जान्हवी: हो कारण तुम्ही संध्या शी प्रेम करता आणि माझ्याशी नाही.

सूर्या: हो. मी संध्याशी प्रेम करतो. तिला पहिल्यापासून. तिला ओळखायला लागल्यापासून. या पत्राच्या गोंधळामुळे किमान माझ्या भावना संध्यापर्यंत पोहोचल्या. त्याचाच आनंद आहे मला. तुमचा मोलाचा वाटा आहे यात. तुम्ही हा पत्राचा घोळ घातला नसता तर. बरं, ते सगळं जाऊ द्या. मला सांगा तुम्ही मला माफ कराल ना.

जान्हवी: सर तुमच्या नजरेत मी वेंधळी असेन ही पण तुम्ही अजून मला ओळखलेलं नाही आहे. हे खरं आहे की मी तुमच्यावर प्रेम करते. त्यासोबत हे ही इतकंच खरं आहे की मी अशी कुठलीच आशा नव्हती ठेवली की माझ्या प्रेमाला तुम्ही स्वीकार कराल पण तुम्ही मला तुमच्यावर प्रेम करण्यापासून थांबवू शकत नाही. निदान माझं लग्न होऊ पर्यंत तरी आपल्या मनाशी ही इच्छा बाळगेनच की कधी तरी तुम्ही माझ्या प्रेमाचा स्वीकार कराल. त्यासोबतच मी तुम्हाला वचन देते की तुमच्या आणि संध्याच्या मध्ये मी कधीच नसेन.

(इतकं बोलूपर्यंत जान्हवीच्या डोळ्यात पाणी येणे स्वाभाविकच होते. पाणेरी डोळ्यांनी जान्हवी सूर्याच्या कॅबिनमधून निघण्यासाठी उठते)

सूर्या: मिस. जान्हवी थांबा. Please try to understand.

जान्हवी: सर आजसाठी पुरे. Now you try to understand please.

(इतकं बोलून जान्हवी निघून जाते आणि थेट रेस्टरूम गाठते. तिला रेस्टरूम मध्ये रडत जाताना संध्या पाहते आणि ती देखील जान्हवीच्या दिशेने जाऊ लागते)

(जान्हवी रेस्टरूम मध्ये रडत असते आणि तितक्यात तिकडे संध्या पोहोचते)

संध्या: अगं जानू काय झालं? रडतेस कशाला?

(जान्हवी काही रडायची थांबत नव्हती. संध्याच्या अनेक प्रयत्न वाया गेले होते. रेस्टरूम मध्ये कोणीतरी येण्याचा आवाज आला तेव्हा कुठे जाऊन जान्हवी रडायची थांबली. आपला चेहरा नीटनेटका करून जान्हवी संध्यासोबत रेस्टरूम बाहेर निघते.)

आता संध्याकाळ झाली होती. बँकेतून नेहमीप्रमाणे संध्या जान्हवीसोबत निघणार होती. संध्याने ठरवले होते की घरच्या वाटेवर जान्हवीशी बोलायचे.

संध्या: जानू, काय झालं होतं? का इतकी रडत होतीस? नक्की कॅबिनमध्ये काय झाले?

जान्हवी: तिकडे समोर बघ. माझं देखील तसेच झाले आहे. माझाही सूर्य मावळला.

संध्या: अगं, असं म्हणू नकोस. होईल सगळं नीट.

जान्हवी: तो सूर्या तुझ्यासमोर मला कधी पसंत करेल का? उगाचच मला खोटी आशा दाखवू नकोस.

संध्या: अरे जानू, असं काही नाही म्हटलं ना मी. तुम्हां दोघांना मी बजावून सांगितलं आहे माझ्यासाठी सूर्या म्हणजे आपल्या शाखेचा मॅनेजर. त्यापलीकडे काही नाही.

जान्हवी: मी पण त्यांना बजावून सांगितलं आहे की ते मला त्यांच्यावर प्रेम करण्यापासून थांबवू शकत नाही. माझं लग्नं ठरूपर्यंत का होईना, माझं प्रेम तसंच असेल.

संध्या: अगं बाई, इतकी हिम्मत आली कुठून म्हणायची? This calls for a celebration. चल काही तरी मस्त चमचमीत खाऊ. आज माझ्यातर्फे पार्टी.

— भाग #५ “अशी ही मनवामनवी” समाप्त —

— भाग #६ लवकरच — 

संध्या भाग #४ “फुटकं नशीब”

— भाग #१ “पत्र” —

https://girishshenoy10.wordpress.com/2015/06/18/संध्या-भाग-१-पत्र/

— भाग #२ “पोचपावती” —

https://girishshenoy10.wordpress.com/2017/05/29/संध्या-भाग-२-पोचपावती/

— भाग #३ “गैरसमज” —

https://girishshenoy10.wordpress.com/2018/01/09/संध्या-भाग-३-गैरसमज/

— भाग #४ “फुटकं नशीब” —

संध्या सूर्याच्या कॅबिनमधून गेली होती आणि सूर्या तिच्याकडे बघण्या व्यतिरिक्त काही करू शकत नव्हता. बँक मधील सर्व कर्मचारी संध्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघत होते पण तिच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया तीळ मात्र पण बदलली नव्हती. ती नेहमीप्रमाणे आपल्या जागेवर येऊन आपलं काम करू लागली. बाकीचे कर्मचारी देखील आपलं काम करू लागले. सर्वांनाच जाणून घ्यायची इच्छा होती की कॅबिन मध्ये नक्की काय झाले.

जान्हवीने संध्याकडे काय झालं होतं हे विचारायचा प्रयत्न केला पण संध्याने काम आहे असे सांगून तिला टाळले. जान्हवी जेव्हा खूपच विचारपूस करू लागली तेव्हा संध्याची एक नजरच पुरे होती तिला गप्प बसवण्यासाठी. दिवस नेहमीप्रमाणे जाऊ लागला आणि आता वेळ झाली होती जेवणाची. संध्याला माहित होते की जेवणाच्या वेळी ती आपल्या सहकाऱ्यांच्या प्रश्नाला सामोरे जावे लागणारच आणि तसेच झाले. जेवणाला बसल्या-बसल्या शिंदे काकूंनी अपेक्षित तो प्रश्न विचारलाच.

शिंदे काकू: काय गं संध्या काय झाले आज? आपले साहेब सूर्याप्रमाणे खूपच तापले होते. आम्हाला तर सवय आहे पण तुझ्या नावाने आरडाओरडा करताना आज पहिल्यांदाच ऐकलं.

(संध्या मनातल्या मनात विचार करत होती की या सर्वांना आता काही न काही सांगावं लागणारच. हे असे नाही सोडायचे)

संध्या: काही नाही हो. ते भोसले साहेबांच्या अकाउंट मध्ये गफलत झाली होती असे सरांना वाटले कारण त्यांना भोसले साहेबांचा फोन आला होता. मी सर्व काही त्यांना नीट समजावून दिल्यावर त्यांना पटलं की आपल्या बँकेकडून काही चूक झाली नाही आहे. सरांचा काही तरी गैरसमज झाला होता.

असे बोलून संध्याने विषय तिकडेच संपवला. आता पर्यंत सर्वांचं जेवण झालं होतं. संध्याचं तर आधीच झालं होतं पण तरी ती थांबली होती. ती जान्हवीचं जेवण होण्याचं वाट बघत होती. जान्हवीचं जेवण होताच ती उठली पण संध्याने तिचा हाथ पकडला आणि तिला परत बसवले.

संध्या: जान्हवी बैस. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे.

जान्हवी: हा Sandy बोल ना. (जान्हवी परत डाईनिंग टेबलं वर बसली)

संध्या: जान्हवी तुझं सूर्या प्रकरण मला महाग पडलंय.

जान्हवी: म्हणजे, आज सकाळी???

संध्या: हो..

जान्हवी: मग तू काय सांगितलंस?

(संध्या कॅबिन मध्ये झालेली सर्व हकीकत जान्हवीला सांगते)

जान्हवी: जळलं माझं कर्म! आयुष्यात पहिल्यांदा कोणालातरी प्रोपोस करू पर्यंत माझी मजल गेली होती. पण माझं नशीब दळभद्रीच. एक मिनिट.. म्हणजे सूर्या सरांना वाटलंय की तू प्रेम करतेस त्यांच्यावर आणि तुझ्या प्रेमाला त्यांनी होकार दिला असं म्हणायचं आहे तुला.

संध्या: जान्हवी जरा डोकं भानावर ठेवून बोल. ते पत्र मी तुझ्या बोलण्याने लिहिले होते. बाकी माझं त्या पत्राशी आणि तुझ्या सूर्याशी तिळमात्र ही संबंध नाही. हे त्यांनादेखील मी बजावून सांगितलं आहे. माझ्या बोलण्याने त्यांना अंदाज आलाच असेल की ती मैत्रीण म्हणजे तूच. मला असं वाटतं की आज झालेल्या प्रकरणामुळे तुझा मार्ग बऱ्यापैकी मोकळा झाला आहे. तू एकदा त्यांच्याशी बोललं पाहिजे.

जान्हवी: काहीही हं Sandy.

संध्या: अगं खरंच!

जान्हवी: पण माझंच नशीब फुटकं ना!

(जान्हवी आणि संध्या बोलत असताना तिकडे बँकेचा कारकून शरद येतो)

शरद: संध्या मॅडम सरांनी तुम्हांला बोलवलं आहे.

जान्हवी: आता कशाला?

(शरद काही उत्तर देईल इतक्यात संध्या बोलते)

संध्या (जान्हवीकडे बघून): अगं त्यांना कसं माहित असेल?

संध्या (शरदकडे बघून): तुम्ही जा. मी आलेच.

शरद: होय मॅडम.

(शरद निघून जातो आणि त्याच्या पाटोपाट संध्या आणि जान्हवी देखील निघतात)

संध्या आपल्या बॅग मध्ये डब्बा ठेऊन आपल्या सवयीप्रमाणे डायरी आणि पेन घेऊन सूर्याच्या कॅबिनकडे जाते. तिला आतून कुठेतरी माहित असते की विषय सकाळचाच असणार आहे आणि डायरी पेनची काही गरज लागणार नाही.

संध्या: मे आय कम इन सर

सूर्या: या संध्या या. मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे.

संध्या: हा सर बोला.

(संध्या आपली डायरी उघडते)

सूर्या: नाही डायरी ची गरज नाही. मला फक्त सकाळी घडलेल्या प्रकारासाठी तुमची माफी मागायची होती. I am sorry. I should have behaved myself. पन माझा राग control नाही झाला आणि मी तुम्हाला धमकी आणि अजून काय काय बोलून गेलो. I am seriously sorry. I am feeling very guilty for my behavior.

संध्या: It’s ok सर. मी पण घडलेल्या गोष्टी विसरली आहे आणि तुम्ही पण विसरून जा.

सूर्या: मी पन तुम्हाला जे काही बोललो ते विसरून जा.

संध्या: हो सर. येऊ मी?

सूर्या: हा या.

(संध्या उठून निघते. दरवाज्या जवळ पोहोचलीच होती इतक्यात सूर्या बोलतात)

सूर्या: संध्या जाण्याआधी मला एक सांगा.. ती मुलगी जिच्या म्हनन्यावरून तुम्ही पत्र लिहिले ती म्हणजे जान्हवी ना?

संध्या: हो सर.

सूर्या: फुटकं नसीब माझं..

(संध्या smile करते आणि निघून जाते)

— भाग #४ “फुटकं नशीब” समाप्त —

— भाग #५ लवकरच — 

संध्या भाग #३ “गैरसमज”

​​संध्या

—- भाग #१ “पत्र” —-

https://girishshenoy10.wordpress.com/2015/06/18/संध्या-भाग-१-पत्र/

—- भाग #२ “पोचपावती” —-

https://girishshenoy10.wordpress.com/2017/05/29/संध्या-भाग-२-पोचपावती/

—- भाग #३ “गैरसमज” —-

सूर्याच्या कॅबिनमधून आलेला आवाज सर्वांनीच ऐकला होता. सूर्या कधीच कोणाशी वरच्या आवाजात बोलत नसे आणि संध्या देखील आपल्या कामात निपुण होती. अश्या अवस्थेत नक्की काय झालं असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. संध्याला काही कळेनासे झाले होते पण आता साहेबांनी आत बोलावलं आहे म्हणजे जावं तर लागेल. आपल्या सवयीप्रमाणे ती एक डायरी आणि एक पेन घेऊन सूर्याच्या कॅबिनच्या दिशेने निघते.

“मे आय कम इन सर” म्हणत संध्या सूर्याच्या कॅबीनमध्ये जाते. संध्या आत येताच सूर्या तिला माघून दार लावून घ्यायला सांगतो. संध्या दार लावून घेते. बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष सूर्याच्या कॅबिनकडे असते.

कॅबिनचं दार बंद होताच सूर्या आपल्या जागेवरून उठतो आणि संध्या जवळ येऊन तिला कडकडीत मिठी मारतो. संध्या काही सेकंदासाठी स्तब्द होते पण लगेचच भानावर येते आणि सूर्याला धक्का मारून बाजूला करते.

संध्या: सर, तुम्ही हे काय करताय तुम्हाला कळतं का? तुमच्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती. (संतप्त होऊन) परत जर असं काही करायचा प्रयत्न केलात तर मी विसरेन की तुम्ही आमचे मॅनेजर आहात.

(संध्या कॅबिन मधून निघतच असते की तितक्यात सूर्या तिला थांबवतो)

सूर्या: संध्या थांब. जर मी जे केले ते चुकले तर हे काय? (सूर्या संध्याला तिच्या अक्षरात असलेले प्रेम पत्र दाखवतो)

सूर्या: स्वतः प्रेम पत्र लिहायचे आणि मी जवल घेताच सती सावित्री असन्याचे ढोंग करायचे. मिस संध्या तुम्ही तर नंतर विसरनार की मी तुमचा मॅनेजर आहे पण आता मी तुम्हाला स्वस्त बसू देनार नाही. HR कडे मी तुमची complaint करणार आणि माझ्याकडे तर पुरावा देखील आहे. आता मी बघतो तुम्हाला कोण वाचवता ते.

संध्या: सर पण…

सुर्या: गप्प बसा. आता तुमच्या आवाजाला काय झालं? काही वेलापूर्वी तर मला धमकी देत होता.

संध्या: सर ऐका तरी..

सूर्या (किंचाळत): मी म्हटलं ना गप्प बसा. आता मी बोलनार आणि तुम्ही ऐकणार. मी तुम्हाला खूप प्रेम करतो पण सांगायला नेहमी घाबरायचो कारण कलायचे नाही की काय बोलू आणि कसं बोलू? आज सकाळी आल्यावर मी तुमचे पत्र वाचले आणि मला वाटले देवाने माझे ऐकले आणि समोरूनच तुम्ही पत्र लिहिले.

(मध्येच सूर्याला थांबवत)

संध्या: सर, तुम्ही अजून काही बोलाल त्या अगोदर प्लिझ माझं ऐकून घ्या आणि मला बोलू द्या.

संध्या: तुमच्या भावनेचा मी आदर करते पण मी तुम्हाला नेहमी आमच्या शाखेचे मॅनेजर याच नजरेने पाहिले. तुम्ही खूप हुशार आणि प्रतिभावान आहात यात शंकाच नाही. पण माझ्या मनात तुमच्यासाठी तशी काही भावना नाही. होय, मी ते पत्र लिहिले. तुम्ही अगदी बरोबर ओळखले की ते अक्षर माझेच आहे. त्यातील शब्द देखील माझेच आहेत पण भावना मात्र माझी नाही. मी ते पत्र कुणाच्यातरी सांगण्यावरून लिहिले होते. माझ्यासाठी नव्हे तर त्या व्यक्तीसाठी. ती तुमच्यावर खूप प्रेम करते आणि तुमच्याबद्दलच बोलत असते. तिच्या मैत्रीसाठी मी हे केले. माझ्या पत्रामुळे तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल मला माफ करा पण मी तुम्हाला परत सांगू इच्छिते की मी तुम्हाला फक्त माझ्या शाखेचे एक हुशार मॅनेजर म्हणून बघते. अजून काहीही नाही.

(इतकं बोलून संध्या सूर्या कडे न बघता किंवा त्याच्या प्रतिक्रियेची वाट न बघता कॅबिनमधून निघून जाते)

सूर्या (स्वतःशीच): तुम्हाला मी माझं बनवूनच राहणार!

— भाग #३ “गैरसमज” समाप्त —

— भाग #४ लवकरच —

संध्या भाग #२ “पोचपावती”

​​संध्या

—- भाग #१ “पत्र” —-

https://girishshenoy10.wordpress.com/2015/06/18/संध्या-भाग-१-पत्र/

—- भाग #२ “पोचपावती” —-

सूर्या एका महत्वाच्या मिटिंगमुळे बँकेबाहेर गेला होता. सूर्याच्या assistant कडून जान्हवीला माहिती मिळते की सूर्या मिटिंग झाल्यावर थेट घरी जाणार आहे आणि आता उद्याच बँकेत येणार आहे. आता सूर्या उद्या येणार म्हटल्यावर जान्हवीच्या रात्रीच्या झोपेची वाट लागणारच होती. जान्हवीला जाग्रणासाठी लागणारी साथ संध्या देईल अशी अपेक्षा जान्हवीला होती आणि संध्याने देखील तिला निराश केले नाही. आपले उलटसुलट प्रश्न विचारून जान्हवीने संध्याची झोप उडवली होती. दोघेही आता सकाळ होण्याची वाट पाहत होते. जान्हवीला उत्तर हवे होते आणि संध्याला जान्हवीच्या प्रश्नांपासून आराम.

कधीच वेळेवर न पोहोचणारी जान्हवी आज मात्र सर्वात पहिली पोहोचली होती. एक-एक करून बँकेतील कर्मचारी बँकेत येत होते पण ज्याची वाट जान्हवी पाहत होती तो मात्र अजून आला नव्हता. सूर्याच्या प्रेमात तहान भूक विसरलेली जान्हवी आता चांगलीच कासावीस झाली होती. इतक्यात तिला सूर्या येताना दिसला.

सूर्या आत येताच त्याची नजर जान्हवीकडे गेली आणि त्याने जान्हवीला गुड मॉर्निंग विश केले. तिच्या cubicle समोरून सूर्या पुढे गेला आणि परत मागे आला.

—- सूर्या आणि जान्हवी मध्ये झालेले संभाषण —-

सूर्या: जान्हवी

जान्हवी: हा सर, बोला ना. वाचलत का ?

सूर्या (थोडंसं चाचपडत): काय? काय वाचला?

जान्हवी (भानावर येते): नाही सर काही नाही. तुम्ही काही विचारत होता का मला?

सूर्या (मस्करीत): हो आणि हमेशा प्रमाणेच तुमचा काही माझ्या बोलण्याकडे ध्यान न्हवतं.

जान्हवी: अहो सर तुम्ही का म्हणून हो मराठीची इतकी वाट लावता. तुम्ही ना एखादी मराठी मुलगी बघा आणि तिच्याशी लग्न करा. त्या तुम्हाला बरोबर मराठी शिकवतील. मी बघू का तुमच्यासाठी एखादी अशी मुलगी?

सूर्या: माझ्या लग्नाचं जाऊ द्या. मला सांगा नेहमी वेलेवर येणारी संध्या आज अजून आली नाही आणि कधीच वेलेवर न येनाऱ्या तुम्ही आज वेलेत कश्या?

जान्हवी (तोंड खाली करत): तिचं मला माहित नाही सर. ती काही मला बोलली नाही आणि मी लवकर आली कारण मला काम होतं.

सूर्या (हसत): काम आणि तुम्हाला. तुमचा कॉम्पुटर अजून ON नाही जान्हवी मॅडम. असो.

—- संभाषण समाप्त —-

सूर्या आपल्या कॅबिनच्या दिशेने चालू लागतो.

सूर्याला कॅबिनमध्ये जाऊन आता जवळपास १० मिनिटे झाली होती पण कॅबिनमधून काही हालचाल होताना दिसत नव्हती.

धावत पळत आपला घाम पुसत बँकेत एक मुलगी येते. लेट मार्क पासून संध्या थोडक्यात वाचते.

—- संध्या आणि जान्हवी मधील संभाषण —-

संध्या: आज पूर्ण चाळीमध्ये पाण्याचा इतका गोंधळ होता की विचारू नकोस. तुझ्या चेहऱ्याला काय झालयं? सूर्य मावळला का? (हसते)

जान्हवी: कुचट आहेत भावोजी तुझे.

संध्या: भावोजी. अरे बापरे पैठणी दिलेली दिसतेय.

(जान्हवी पाणी पिण्याच्या बाटली ने संध्याला मारते.)

—- संभाषण समाप्त —-

इतक्यात सूर्याच्या कॅबिनचा दरवाजा उघडतो.

सूर्या: संध्या आताच्या आता माझ्या कॅबिनमध्ये या.

कोणाला काहीच कळात नाही. सूर्या कधीच बँकेतील कर्मचाऱ्यांवर आवाज चढवत नसे आणि त्यातल्या त्यात संध्यावर तर कधीच नाही. मग सूर्या सर असे का रागावले आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली होती.

—- भाग #२ “पोचपावती” समाप्त —-

—- माफीनामा —-

माझ्या वाचक मित्रांनो मी पहिल्या भागाच्या शेवटी भाग #२ लवकरच असे लिहिले होते आणि आज दोन वर्षांनंतर लिहीत आहे यासाठी क्षमा असावी. खरंतर मी अक्षम्य गुनाह केला आहे पण तरी मोठ्या मनाने मला तुम्ही माफ कराल अशी अपेक्षा करतो. काही गोष्टी अश्या घडत गेल्या ज्यामुळे मला लिखाण करता जमलेच नाही पण आता मात्र मी “लवकरच” असे लिहून तुम्हा सर्वांना निराश करणार नाही.

माफी असावी आणि आपला अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे हे विसरू नका..

तुमचाच,

गिरीश

—- भाग #३ लवकरच —-

संध्या भाग #१ “पत्र”

संध्या 

—-भाग #१ “पत्र”—-

ही कहाणी आहे संध्याची. एका साधारण मध्यमवर्गीय घराण्यात जन्माला आलेल्या असाधारण मुलीची.

​पवार कुटुंब मुंबईच्या दहिसर परिसरात राहायला होते. कुटुंब प्रमुख महादेव प्रभाकर पवार आणि त्यांच्या पत्नी पार्वती महादेव पवार हे एक सुखी संसाराची गाडी चालवत होते. व्यवसायाने कारकून असलेले महादेव पवार हे लालबागच्या राजाचे मोठे भक्त. त्यांना ओळखणारी माणसं इतरांना त्यांच्या भक्तीची उदाहरणं द्यायचे. पार्वतीबाई गृहिणी होत्या. त्यादेखील राजाच्या भक्तीमध्ये तल्लीन असत. अश्या या जोडप्याला लग्नाच्या तब्बल ४ वर्षानंतर राजाने कन्यारत्नाचा आशीर्वाद दिला. या कन्यारत्नाचे नाव ‘संध्या’ असे ठेवण्यात आले होते. दिवेलावणीच्या वेळी जन्माला आलेले पोर आणि राशी अक्षर ‘स’ असा योग जुळून आला होता. पवार कुटुंबीय या कन्यारत्नाच्या आशीर्वादाने खूपच खुश होते. त्यांच्या आनंदाला परिसीमा उरली नव्हती.

संध्याच्या जन्माला आता १० वर्ष उलटून गेली होती. ती सर्वांचीच लाडकी झाली होती. अभ्यासात निपुण, उत्कृष्ट नृतिका आणि मधुर गायिका अशी ओळख तिने स्वतःसाठी बनवून घेतली होती. आईला घरकामात मदत करता करता मोठी झालेली संध्या ही आता एक उत्तम सुग्रण देखील झाली होती. वाणिज्यात पद्वी प्राप्त करून संध्या आता बँकेत चांगल्या हुद्यावर कामाला लागली होती.

लग्न वयाच्या संध्याने आपल्या आईकडून एक चांगली सून होण्याचे सर्व गुण घेतले होते. महादेव आणि पार्वतीला आता संध्याच्या लग्नाची काळजी वाटू लागली होती. संध्यामात्र आपल्या मतांवर ठाम होती. तिला श्रीमंत नवरा नको होता पण हवा होता एक असा जोडीदार जो तिला समजू शकेल आणि तिच्यावर खूप प्रेम करेल. तिला आपल्या नवऱ्याच्या यशा मागचं कारण बनायचं होतं. यात काही गैर नव्हतं.

सूर्या नायर हा संध्याच्या बँकेत व्यवस्थापक (Manager) होता. प्रतिष्ठीत विद्यापीठातून MBA केल्यानंतर सूर्या बँकेत कामाला लागला होता. जान्हवी ही संध्याची बँकेत सोबत काम करणारी मैत्रीण. सूर्या आणि संध्या तसं तर कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीबद्दल कधी काही बोलले नाही. जान्हवी मात्र एक पाऊल पुढे होती. सूर्याशी अपार प्रेम करणारी जान्हवी त्याच्याशी बोलायला कारणं शोधात असे. एका दिवशी जान्हवीने आपल्या मनात सूर्याबद्दलचं प्रेम त्याच्यासमोर व्यक्त करायचे ठरवले. आता ठरवून तर झाले होते की त्याला सांगायचं पण कसं हे मात्र तिला सुचत नव्हतं. शेवटी तिने संध्याची मदत घेण्याचे ठरवले. संध्याने तिला सूर्याला पत्र लिहायला सांगितले व म्हणाली त्या पत्रातून आपलं मनोगत व्यक्त कर. जान्हवीला देखील ही कल्पना आवडली. जान्हवी बसली पत्र लिहायला. दीड तास उलटून गेला होता पण पान अजून कोरंच होतं. काही सुचेनासं झालं होतं. मनात नुसती आग लागली होती. शेवटी तिने तिच्या फायरब्रिगेडकडे जाण्याचे ठरवले. तिची फायरब्रिगेड संध्या.

जान्हवी : Sandy

संध्या : काय गं? काय झालंय? तुझा चेहरा का इतका उतरलाय? तुझा सुर्य उगवण्या अगोदर मावळला की काय?

जान्हवी : तसंच समज यार. माझी मदत कर ना गं. मला सुचतच नाही आहे काय लिहू पत्रामध्ये…

संध्या : अगं तुझ्या मनात जे आहे ते लिहून टाक.

जान्हवी : मला शब्द पण सापडत नाही आहेत आणि भीतीने माझे हाथ पण कापत आहेत. त्यामध्ये माझं अक्षर बघ, कोंबड्याचे पाय.

संध्या : नाही गं. तसं काही नाही आहे. खरं म्हणजे कोंबड्यांचे पाय यापेक्षाही सुंदर असतात. (हसत)

जान्हवी : काहीही हा Sandy.

जान्हवी : Sandy माझं एक काम करशील का?

संध्या : हे पत्र मी लिहिणार नाही आहे त्या व्यतिरिक्त काही असेल तर सांग कारण त्या पत्रात तुझं मन, तुझे शब्द असायला हवे.

जान्हवी : अगं फक्त आता लिहून दे. नंतरचं मी सांभाळून घेईन.

संध्या : नाही

जान्हवी : एकदाच. प्लीज प्लीज प्लीज Sandy. तुझ्या छान अक्षरात छान काहीतरी लिहून दे ना प्लीज.

जान्हवीच्या अथक प्रयत्नानंतर संध्याने होकार दिला आणि पत्र लिहिले.

—- पत्र —-

सूर्या सर,

पहिलाच प्रयत्न आहे म्हणून जरा भीती वाटत आहे आणि तितकीच उत्सुकता देखील आहे. माझी अशी इच्छा आहे की हे पत्र वाचून तुम्ही थोडसं रागवावं आणि मला पूर्णपणे समजून सुद्धा घ्यावं. तुम्ही रागवावं कारण तुम्ही रागावलात की खूप handsome दिसता. तुमचा चेहरा लाल होतो. असं वाटतं त्या लाल चेहऱ्याला पापी देत राहावं आणि अजून लाल करावं. इतक्यात तुम्हाला कळालच असेल की मी हे पत्र का लिहिले आहे. सर मी तुमच्याशी जीवापाड प्रेम करते आणि तुमचीच बायको होण्याचे स्वप्नं बघत असते. अगदी उघड्या डोळ्यांनीदेखील मी हेच स्वप्नं बघते आणि त्या नादातच चुका करून बसते. चुका केल्या की तुम्ही रागावता आणि परत तुमच्यावरचं माझं प्रेम मला स्वतःवरचा ताबा सोडायला भाग पाडतं. परत त्या लाल चेहऱ्यावर पापी द्यावीशी वाटते आणि परत तेच सगळं.

कालचीच गोष्ट सांगते. काल आईने स्वयंपाकाची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. आम्ही जेव्हा जेवायला बसलो तेव्हा माझी फजितीच झाली. डाळीत मिटाऐवजी साखर आणि करपलेली पोळी. शेवटी बाबांनी हॉटेलमधून जेवण आणलं. खरं सांगू तर जेवण बनवताना मी तुमचाच विचार करत होती आणि त्यातच हे सगळं असं झालं. कित्येकवेळा मी दुध उतू घातलंय आणि काय काय केलंय. लिस्ट काढली तर ती संपणारच नाही. असो.

सांगायचं इतकंच की मी जर बूट तर तुम्ही मोजे. मी जर ब्रेड तर तुम्ही बटर. मला माहित आहे तुम्हाला ब्रेड बटर खूप आवडत. माझे असतील अश्रू तर तुमचा असावा हाथ. माझे असतील डोके तर तुमची असावी मांडी. विंचरत असेन मी केस तर मागून असावी तुमची मिटी.

मी खूप प्रेम करते तुमच्यावर सर… तुमच्या होकाराची वाट बघत असणारी तुमची आणि फक्त तुमचीच.

—- पत्र समाप्त —-

संध्याने हे पत्र जान्हवीला दिले. जान्हवीला पडलेला नवीन पेच की हे सूर्यापर्यंत कसे पोहोचवायचे? शेवटी तिने त्याच्या टेबलवर ते पत्र ठेवले आणि पळत आली आपल्या जागेवर. आता दोगं वाट बघत होते ते सूर्याच्या उत्तराची…

—- भाग #१ “पत्र” समाप्त —-

—- भाग #२ लवकरच —-